तुलना बदलत्या नियमांची
जुन्या आणि नव्या खो-खो नियमांची तुलना करणे गरजेचे. संघ रचना जुन्या नियमा प्रमाणे राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत एका संघात १२ खेळाडू व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १५ खेळाडू तसेच १ प्रशिक्षक व १ संघ व्यवस्थापक आहेत नव्या नियमा प्रमाणे एका संघात १५ खेळाडू आणि १ प्रशिक्षक, १ सहाय्यक प्रशिक्षक आणि १ संघ व्यवस्थापक असतील. बोनस पॉइंट जुन्या नियमा प्रमाणे खो-खो मध्ये कुठलेही बोनस पॉईंट दिले जात नाही. नव्या नियमा नुसार खुंट मारून किंवा सूर मारून गडी बाद केल्यास अतिरिक्त एक गुण. संरक्षक संघाचा खेळाडूने ३ मिनिटापेक्षा जास्त संरक्षण केल्यास त्याच्या संघास एक गुण अधिक दिला जाईल. पंच मंडळ जुन्या नियमानुसार एका मैदानावर १ पंच प्रमुख, २ पंच व १ गुणलेखक, १ सहाय्यक गुणलेखक आणि १ वेळाधिकारी यांची नियुक्ती असते. नव्या नियमानुसार एका मैदानावर १ पंच प्रमुख, २ पंच, २ सहाय्यक पंच, १ गुणलेखक, ३ सहाय्यक गुणलेखक आणि १ वेळाधिकारी असतील. संरक्षण जुन्या नियमा प्रमाणे तीन खेळाडूंची एक तुकडी मैदानात येते. एकूण नऊ खेळाडू तीन तुकड्यांच्या क्रमाने संरक्षणास येतात. नव्या नियमा प्रमाणे प्रथम ३ खेळाडू मैदानात येतील व त्यातील एक गडी बा...