Olympic आणि खो-खो
मागील वर्षी होणारे Tokyo Olympic कोरोना मुळे यावर्षी आयोजित करण्यात आले. 23 जुलै रोजी याचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला तो प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत. या covid-19 च्या काळात आयोजन करणे हे मुळातच कठीण काम होते. ते त्यांनी करून दाखवले याबद्दल त्यांचे कौतुक. असो, आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. Olympic मध्ये खो-खो खेळाचा समावेश कधी होणार हा प्रश्न कित्येक वर्ष अनुत्तरीत आहे, व पुढे तो किती वर्ष राहील हे कोणी सांगू शकणार नाही. कारण खो-खो खेळाचा समावेश Asian Games व Olympic मध्ये व्हावा हे, दूर दृष्टीचा कायमच अभाव असलेल्या पदाधिकऱ्यांना असे कधी वाटलेच नाही. ( खो-खो तील पदाधिकारी दूर दृष्टी कोणत्या क्षेत्रात वापरतात हे सर्वशृत आहे. ) काही वेळी खेळांमध्ये फक्त असोसिएशन ची चूक असते असे नाही, तर कधी संघटकांचा ( खेळातील विविध संस्था चालवणारे ) आडमुठे पणा खेळाच्या प्रसाराच्या आड येतो. पण खो-खो च्या बाबतीत असे नाही, येथे सर्वस्वी चूक ही असोसिएशन आणि त्यामधील पदाधिकरी यांचीच आहे. कबड्डी आणि खो-खो दोघेही भारतीय मातीतील खेळ. कबड्डी एशियाड पर्यंत पोहोचू शकली ती असोसिशनच्या आणि स्व. बुवा सा...