खो-खो आणि नवीन नियम
खो-खो
काल, आज आणि उद्या.....
वाचा चार भागात.
17 जानेवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे देशातील निवडक खो-खो खेळाडूंचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या शेवटी मिनी खो-खो लीग घेण्यात आली. या लीगची आखणी संभाव्य अल्टिमेट खो-खो लीग सारखी करण्यात आली. साधारणता मागील तीन वर्षापासून या लीग ला मुहूर्त लाभत न्हवता. इथे सर्व प्रथम "नवे खो-खो नियम" सर्वांना कळाले. नव्या नियमानुसार 8 ट्रॅक ऐवजी 6 ट्रॅक केले गेले. संरक्षण करण्यासाठी नेहमी प्रमाणे तीन खेळाडूंची तुकडी मैदानात येईल मात्र एक गडी बाद झाल्यावर आक्रमण थांबवले जाईल व दुसरा गडी मैदानात आल्यावर खेळ पुन्हा खुंटा वरून सुरू करण्यात येईल. त्यामुळे मैदानात कायम तीन संरक्षक असतील. खो-खो चे मैदान छोटे करण्यात आले आहे. सूर व डांब मारून गडी बाद केल्यास एक ऐवजी दोन गुण दिले जातील. इत्यादी नवे नियम तयार करण्यात आले. हे सर्व नवे नियम अल्टिमेट खो-खो साठी बनविण्यात आले आहे असे सर्वप्रथम सांगण्यात आले आणि आता हेच नियम खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया त्यांच्या सर्व नियमित स्पर्धांवर लादण्याचा तयारीत आहे.
हे नवीन नियम खो-खो च्या मूळ गाभ्याला हात लावतात किंबहुना ते मूळ गाभाच बदलतात, हे अतिशय भयानक आहे. खो-खो चा इतिहास सांगतो की हा खेळ महाभारतापासून खेळला जात आहे. या खेळाचा गाभा पूर्णपणे बदलण्याचा अधिकार kkfi ला असू शकत नाही. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अल्टिमेट खो-खो कोणत्या कायद्याखाली रजिस्टर झाले आहे हेच कोणाला माहित नाही. ही प्रायव्हेट कंपनी आहे की पब्लिक कंपनी ,की सोसायटीज रजिस्त्रेशन ॲक्ट खाली स्थापन झालेली संस्था आहे ,की नॉट फोर प्रोफिट ऑर्गनायझेशन आहे. kkfi नेच ultimate kho kho स्थापना केले आहे की अन्य दुसऱ्यांनी याची स्थापना केली, याबद्दल खो-खो विश्व अंधारात आहे.
अल्टिमेट खो-खो लीग जरूर व्हावी. ती त्यांनी कोणत्याही स्वरुपात घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे, पण राष्ट्रीय स्पर्धा, शालेय स्पर्धा ,राज्यस्तरीय स्पर्धा , खेलो इंडिया व इतर खो-खो च्या स्पर्धा मूळ खो-खो च्या नियमानुसारच व्हायला हव्यात , हीच सगळ्यांची एकमुखी मागणी आहे.
- शानूल देशमुख
अवश्य वाचा पुढील भाग खो-खो आणि महाराष्ट्र
खो खो या नवीन नियमांच्या स्वरूपानुसार खेळला जात असेल तर मूळ खो-खो चा पूर्ण गाभाच नाहीसा झाल्या सारखा वाटतो. यामुळे खो-खो चे मूळ स्वरूप पूर्णतः बदलून जात असल्यामुळे या नियमांना विरोध करण्यासाठी आपण सर्व खेळाडू ऐकत्र येऊन काय करू शकतो याबद्दल मार्गदर्शन झाल्यास खूपच उपयोगी ठरेल आणि त्यानुसार आपण सर्व एक पुढचे पाऊल टाकू शकू.
उत्तर द्याहटवाज्या प्रकारे गडी बाद झाल्यावर डाव परत खुंटा पासून सुरू होतो ,म्हणजे खो खो हा जोडीची साखळी सारखा करण्याचा प्रयत्न असावा असं वाटतं आहे , त्यात ज्या प्रमाणे कोणी बाद झाल की सुरवातीचा पॉईंट वर जाऊन साखळी करून डाव सुरू केला जातो
हटवाशानूल, प्रास्ताविक चांगले झाले आहे. नव्या नियमांबद्दल तू लिहितो आहेस आणि सर्वसामान्य खो-खोरसिक, आजी-माजी खेळाडू ह्यांना जागे करतो आहेस, हे छान. पुढचे भाग वाचण्यासाठी उत्सुक आहे.
उत्तर द्याहटवायाचा विरोध झालाच पाहिजे
उत्तर द्याहटवाहे सर्व कबड्डीच्या लिग succesful झाल्यानंतर तसेच करण्याचा प्रयत्न दिसतोय, पण खोखोचा मुळ गाभाच बदलला जाईल, which is not acceptable
उत्तर द्याहटवायाचा ववि
उत्तर द्याहटवायाचा विरोध झालाच पाहिजे या मुळे खो-खो संपेल
उत्तर द्याहटवायाचा ववि
उत्तर द्याहटवायाचा ववि
उत्तर द्याहटवा