खो-खो आणि महाराष्ट्र
महाराष्ट्र आणि खो-खो चा संबंध तसा पारंपारिक व गौरवशाली. देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार विजेते 7 खो-खो खेळाडू हे महाराष्ट्रातील आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी असलेले एकलव्य, राणी लक्ष्मीबाई, वीर अभिमन्यू, जानकी, भरत आणि इला पुरस्कार यांच्या यादीवर नजर टाकल्यास यातील 90 टक्के पुरस्कार विजेते खेळाडू व राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू हे महाराष्ट्रातील आहे. यावरूनच या खेळातील महाराष्ट्राचे प्रभुत्व लक्षात येते.
खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया ही खो-खो मधील मुख्य संघटना आहे. ती विविध राज्य संघटना व त्यांच्या प्रतिनिधी द्वारा खेळाचे कामकाज चालवते. महाराष्ट्र, कोल्हापूर व विदर्भ या तीन संघटनांना राज्याचा दर्जा आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत या तिन्ही संघटनांचे स्वतंत्र संघ सहभागी होतात. महाराष्ट्र, विदर्भ व कोल्हापूर या संघांनी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
खेळाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या पदाधिकारी यांच्या साठी
Management या विषयात एक फार छान वाक्य आहे, ते असे "whenever authorities delegated responsibility steps seen and coextensive with authority". अर्थात जिथे अधिकार व पद येते, तेथे जबाबदारी येतेच. सर्व आजी माजी खो-खो खेळाडू, पुरस्कार विजेते खेळाडू, विविध संस्था, विविध संघटना यांनी देखील या बदलांचा विरोध केला पाहिजे. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. आपला खेळ आपल्यालाच वाचवायला लागणार आहे. म्हणून या सर्वांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्राने उभे राहून या लढ्यात सहभागी व्हायला पाहिजे. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, खेळ हा कायमच संघटने पेक्षा मोठा असतो. खेळच राहिला नाही तर संघटनेला व त्यातील पदाधिकारी यांना काहीच महत्त्व राहत नाही.
- शानूल देशमुख
अवश्य वाचा मागील भाग खो-खो आणि नवीन नियम
अवश्य वाचा पुढील भाग बदलता खो-खो
केवळ काही ठराविक लोक पैसा कामावण्याच्या हव्यासापाई खो खो चा सत्यानाश. करायला लागलेत असचं वाटत
उत्तर द्याहटवामहाराष्ट्र खोखो संघटना काय करतेय? प्रतिनिधी पाठवले आहेत ते खुर्ची गरम करायला गेलेत?
उत्तर द्याहटवा