Olympic आणि खो-खो
मागील वर्षी होणारे Tokyo Olympic कोरोना मुळे यावर्षी आयोजित करण्यात आले. 23 जुलै रोजी याचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला तो प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत. या covid-19 च्या काळात आयोजन करणे हे मुळातच कठीण काम होते. ते त्यांनी करून दाखवले याबद्दल त्यांचे कौतुक.
असो, आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. Olympic मध्ये खो-खो खेळाचा समावेश कधी होणार हा प्रश्न कित्येक वर्ष अनुत्तरीत आहे, व पुढे तो किती वर्ष राहील हे कोणी सांगू शकणार नाही. कारण खो-खो खेळाचा समावेश Asian Games व Olympic मध्ये व्हावा हे, दूर दृष्टीचा कायमच अभाव असलेल्या पदाधिकऱ्यांना असे कधी वाटलेच नाही. ( खो-खो तील पदाधिकारी दूर दृष्टी कोणत्या क्षेत्रात वापरतात हे सर्वशृत आहे. ) काही वेळी खेळांमध्ये फक्त असोसिएशन ची चूक असते असे नाही, तर कधी संघटकांचा ( खेळातील विविध संस्था चालवणारे ) आडमुठे पणा खेळाच्या प्रसाराच्या आड येतो. पण खो-खो च्या बाबतीत असे नाही, येथे सर्वस्वी चूक ही असोसिएशन आणि त्यामधील पदाधिकरी यांचीच आहे. कबड्डी आणि खो-खो दोघेही भारतीय मातीतील खेळ. कबड्डी एशियाड पर्यंत पोहोचू शकली ती असोसिशनच्या आणि स्व. बुवा साळवी सर यांच्या सारख्या ज्येष्ठ क्रीडा संघटकांच्या अथक आणि प्रामाणिक कष्टांमुळे. कबड्डी मॅट वर गेली म्हणून खो-खो सुद्धा मॅट वर गेला पाहिजे तर तो आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाईल हा खो-खो फेडरेशनचा बालहट्ट चुकीचा. दुसऱ्याचे अनुकरण करण्याचे ठरविले की या पेक्षा वेगळे काय होणार. जी गत आपली हॉकीत झाली तशी भविष्यात खो-खो मध्ये होईल अशी भीती वाटते. आपल्या खेळातील मूलभूत कौशल्य जर America, England, Germany, Australia, China या खेळातील महाशक्तींनी ओळखली की ते देखील hockey प्रमाणे खो-खो चे मैदान नवीन प्रकारे व त्यांच्या सोईप्रमाणे करून आपले वर्चस्व कमी करायचा प्रयत्न करतील. पण तो पर्यंत तरी खेळ मातीवर राहील आणि किमान आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाईल. hockey तील भारताची ताकद पाश्चात्त्य देशांनी संपवली, पण खो-खो मध्ये मॅट आणून आपणच आपल्या पायावर कुराड मारायला निघालो आहोत.
खो-खो खेळाचे खरे कौशल्य मातीतच आहे, हे जर आपणच मान्य करणार नसू तर उगाच Olympic मध्ये अमुक वर्षी सहभाग होईल, एशियाड मध्ये अमुक वर्षी प्रदर्शनीय सामने खेळवले जातील असे बिनबुडाचे आश्वासन देऊन काय उपयोग.
karate, skating, 3*3 basketball अशा प्रकारचे खेळ Olympic मध्ये जागा मिळवू शकतात, तर खो-खो का नाही.आपल्या खेळात नक्कीच तेवढे potential आहे. गरज आहे ती फक्त योग्य नेतृत्वाची. ते नजीकच्या भविष्यात लाभणार का?
hockey, cricket आणि football व इतर अनेक खेळांमध्ये मध्ये पाश्चात्य देशातील प्रशिक्षक नेमके जातात. याच प्रमाणे भारतातील अव्वल प्रशिक्षकांना विदेशी पाठवून तेथे खो-खो खेळाची सुरुवात करता येऊ शकते. यातील महत्वाचा प्रश्न असा की भारतात अजून खो खो खेळाडू आणि त्यांच्या संघाचे मानांकन देखील केले गेले नाही तर प्रशिक्षकांना मानांकन कुठून मिळणार. या अत्यंत basic गोष्टी खो-खो फेडरेशन ला जमल्या नाहीत. international kho kho association किंवा asian kho kho federation या सारख्या संघटना registration करून खेळ वाढत नाही. अथवा Olympic मध्येही समाविष्ट होत नाही. त्यासाठी लागते खेळाविषयी असलेली आंतरिक ओढ, प्रामाणिक कष्ट आणि निरपेक्ष वृत्तीने काम करणारे पदाधिकारी.
- शानूल देशमुख
मस्त
उत्तर द्याहटवाअसोसिएशन चे पदाधिकारी हे अगदी मोजकेच असतात परंतु क्रीडाप्रेमी आणि खेळाडू हे असंख्य आहेत,ह्यांनी सर्वांनी एकत्र येऊन काही सकारात्मक करायचे ठरवले तरीही होऊ शकते,त्या दृष्टीने पावले उचलण्याची वेळ आली आहे.तसे केले तरच हे शक्य होईल अन्यथा ह्याहीपेक्षा गंभीर आणि दयनीय अवस्थेतील खेळ पाहण्याची वेळ आपल्यावर अली तर आश्चर्य वाटू नये.
उत्तर द्याहटवामातीतील पारंपरिक मूळ खो खो बचाव मोहीम ही आक्रमकपणे मांडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व खेळाडू,पुरस्कार्थी आणि क्रीडाप्रेमींनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा ह्यासाठी मनापासून शुभेच्या....!!!
कैलास ठाकरे.
(एक खो-खो प्रेमी, महाराष्ट्र)
प्रत्येकाची हिच भावना आहे.
उत्तर द्याहटवा